loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

कलम क्र. १४.७.२

व्याख्या – झोपडपट्टी, फरसबंदी फुटपाथ आणि झोपडीची रचना

i) झोपडपट्ट्या म्हणजे यापूर्वी झोपडपट्टी कायद्यांतर्गत किंवा यापूर्वी जनगणना केलेल्या , किंवा घोषित केलेल्या आणि अधिसूचित केलेल्या झोपडपट्ट्या. झोपडपट्टी म्हणजे असेही क्षेत्र/फूटपाथ ज्यांना झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केलेले किंवा असे मानले गेलेले आहे.

ii) झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम 4 मध्ये दिलेल्या अटींनुसार जर कोणताही क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र म्हणून पात्र ठरत असेल व जनगणनित किंवा घोषित किंवा अधिसूचित केली गेली असेल तर ते क्षेत्र, “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” मानले जाईल.

iii) “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणजे SRAने घोषित केलेला कोणताही क्षेत्र, म्हणजे झोपडपट्टी कायद्याच्या कलम 4 मध्ये दिलेल्या अटींनुसार व / किंवा कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे क्षेत्र. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (SRS) प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO,SRA) द्वारे मंजूर झालेला कोणताही क्षेत्र हा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून मानला जाईल.

iv) “तात्पुरते किंवा कायमस्वरुपी संक्रमण शिबिर बांधकाम करण्याच्या उद्देशाने आवश्यक किंवा प्रस्तावित असलेले आणि SRA मंजूर कोणतेही क्षेत्र हे देखील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र असल्याचे मानले जाईल. आणि SRA द्वारे अशा क्षेत्रात मंजूर केलेले प्रकल्प ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प’ मानले जातील.

v) फरसबंदी (Pavement) म्हणजे कोणतीही नगरपालिका / शासन / निमशासकीय फरसबंदी, आणि SRS च्या हेतूसाठी व्यवहार्य मानल्या जाणार्‍या फरसबंदी.

vi) संरचना म्हणजे स्लम अ‍ॅक्टचा कलम I-B आणि त्याद्वारे जारी केलेले आदेश या अध्यायात परिभाषित केल्याप्रमाणे Protected Occupier चे निवासस्थान होय.

vii) जेव्हा एकाच इमारतीत दोन्ही घटक म्हणजे पुनर्वसन घटक आणि खुल्या बाजारात विक्रीचे घटक बनवले जातात, अशा इमारतीला संयुक्त इमारत म्हणतात.

viii) जनगणनित(Censused) म्हणजे कोणत्याही शासनाच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या, सरकार, किंवा कॉर्पोरेशन आणि जमीन-मालक संस्थेच्या नोंदीमध्ये समाविष्ट केलेले 1976, 1980 किंवा 1985 किंवा १ जानेवारी,1995, आणि १ जानेवारी 2000 यापूर्वी जनगणना झाली आहे असे.

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: