CIHab बद्दल
सेंटर फॉर इक्लुसीव्ह हॅबिटेट (CIHab) हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे ज्याचा उद्देश शहरी गरीबांना त्यांच्या शहरातील प्रचलित गृहनिर्माण हस्तक्षेपांबद्दलची संबंधित अचूक व विश्वसनीय माहितीसह सक्षम करणे आणि सुसज्ज करणे आहे. CIHab चा असा विश्वास आहे की समुदायांचा त्यांच्या अधिवास विकास प्रक्रियेत सहभाग अव्यवहार्य आहे आणि त्यासाठी सर्व संबंधित माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांचा सक्रिय सहभाग गृहनिर्माणातील पार्याप्रप्त, परवडणारी आणि सर्वसमावेशक घरांचा प्रश्न सोडवू शकतो.
CIHab उपक्रम, ह्या पूर्वी DIY Toolkit for Community-Led Development ह्या नावाने जाणारे, त्यांची सुरुवात दि नज सेंटर फॉर सोशल इनोव्हेशन आणि ओमिद्यार नेटवर्क इंडिया यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याने झाली. भारतातील शहरी गरिबांच्या राहणीमानात सुधारणा करू शकणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने Equal Cities Challenge ही स्पर्धा नेमलेली आणि CIHabचे स्थापक ह्या स्पर्धेच्या पाच विजेत्यांपैकी एक होते.
रोहित लाहोटी
रोहित लाहोटी हे CIHab चे सह-संस्थापक आहेत. 5 वर्षांहून अधिक कामकाजाचा अनुभव असलेले ते मुंबईचे आर्किटेक्ट आणि शहरी विकास व्यवसायी आहेत. त्यांचे काम आणि प्रकाशने डिझाइन करण्यापासून ते सार्वजनिक धोरणविश्लेषणापर्यंत आणि अनौपचारिक गृहनिर्माण क्षेत्रात सखोल संशोधन करण्यापर्यंत आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचा माजी विद्यार्थी आणि कॉमनवेल्थ शिष्यवृत्तीचा प्राप्तकर्ता, रोहित सर्वसमावेशक पद्धतीने शहरी विकासाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रक्रियेभिमुख आणि आंतरशास्त्रीय दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो. परवडणारी घरे, जमीन व मालमत्ता हक्क, कार्यकाळ सुरक्षितता, गुणात्मक संशोधन आणि डॉक्युमेंटरी फोटोग्राफी पद्धती ही त्यांच्या आवडीची व कौशल्याची मूलभूत क्षेत्रे आहेत.
सायली मारावार
सायली मारावार ह्या CIHab च्या सह-संस्थापक आहेत. त्या शहरी गरिबांच्या आवासाच्या मुद्यावर काम करणाऱ्या एक सामाजिक विकास व्यवसायी आहेत. त्यांनी ह्या विषयावर काम करणाऱ्या एका अग्रगण्य NGO सोबत ५ वर्ष काम केले आहे जेथे त्यांनी गृहनिर्माण धोरणे आणि योजना अंमलात आणण्यासाठी विविध राज्य सरकारांसह मोठ्या प्रमाणात काम केले आहे. सायली ही अशोका विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाची पूर्व विद्यार्थिनी आहे जिथे तिने अनुक्रमे लिबरल आर्ट्स आणि अभियांत्रिकीचा अभ्यास केला.
योगदानकर्ता
आदित्य हजारे
पेशाने आर्किटेक्ट आणि अर्बन डिझायनर असलेला – आदित्य हजारे याचा “निसर्ग आणि समुदायासाठी डिझाइनिंग” या कल्पनेवर ठाम विश्वास आहे. आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्दीत तो अशाच नात्यांचा शोध घेतो आणि पर्यावरण, जनता आणि शहरी विकास यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करतो. सध्या अर्बन डिझायनर म्हणून कार्यरत असलेल्या आदित्यला स्केचिंग, वाचन, संगीत आणि प्रवास यातही रस आहे. त्याची आवड आणि लोकांबद्दलच्या त्याच्या संवेदनशील दृष्टीकोनातून तो पर्यावरणाला अनुकूल आणि लोकभिमुख डिझाइन करण्यात आणि क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आशावादी आहे.
CIHABचे काम
आम्ही येथे संशोधनावर आधारित राज्य व शहर-आधारित गृहनिर्माण साक्षरता व्यासपीठ तयार करतो. धोरण विश्लेषण, भागधारकांचा अभ्यास आणि भागधारकांशी सल्लामसलत अशा विविध पद्धतींचा वापर करून, आम्ही शहरी गरीब समुदाय जसे झोपडपट्टींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था, इतर समुदायिक संस्था, स्वयंसेवी संस्था, समुदाय प्रतिनिधी आणि इतर भागधारक त्यांच्या जागरूकतेसाठी महत्वपूर्ण माहितीचे एकत्रित विश्लेषण आणि संश्लेषण करतो. ह्या माहितीचा वापर करून शहरी गरीब समुदाय त्यांच्या गृहनिर्माण विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग करू शकतील, हीच आमची आशा.
आमची भौगोलिक उपस्थिती
CIHab सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्याचे अभ्यासाचे पहिले शहर ठाणे आहे आणि ते या व्यासपीठासाठी प्राथमिक संदर्भ आहे.